चित्रपट : वजीर
गीत : सुधीर मोघे
संगीत : श्रीधर फडके
गायिका : आशा भोसले
SUBMITTED BY:SAURABH

D................C#m....D...........
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
Bm.........E.......Bm.............
सावळयाची जणू साऊली || ध्रु ||

D...........A.......D............
धूळ उडिवत गाई निघाल्या
D.........F#m......D................
शाम रंगात वाटा बुडाल्या
E...................D.......
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
Bm......E......Bm................
पैल घंटा घूमे राऊळी || १ ||

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली || २ ||

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी || ३ ||